NCT NCT राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोपट फुकटे यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील गणेश मंडळांना आरती संग्रह व प्रसाद वाटप

राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोपट फुकटे यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील गणेश मंडळांना आरती संग्रह व प्रसाद वाटप

 
नवचैतन्य टाईम्स मुंबई (प्रतिनिधी):-राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अँड श्रीहरी बागल यांच्या संकल्पनेतुन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. पोपट आनंदा फुकटे यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख गणेश उत्सव मंडळांना त्यांच्या वतीने "आरती संग्रह" पुस्तिका आणि प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. "सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत- गणपती बाप्पा मोरया" या संदेशासह हे आरती संग्रह भक्तांमध्ये वाटले जात आहेत.                                                                       या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तांमध्ये भक्तीभाव आणि एकोपा वाढवण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचे श्री. फुकटे यांनी सांगितले.