नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे ):-"शेती ही केवळ व्यवसाय नसून ती एक संस्कृती आहे आणि शेतकरी हा राष्ट्राचा अन्नदाता आहे". या विचाराला आपल्या कार्यातून सिद्ध करणारे नाव म्हणजे नितीन भुजबळ.पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत,रासायनिक शेतीतून सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांना प्रेरित करणारे त्याचबरोबर हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे एक समर्पित कृषी मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आज त्यांच्या कृषी क्षेत्रातील सलग १८ वर्षांच्या अविरत सेवेला पूर्णत्व लाभत आहे.हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही,तर महाराष्ट्रातील आणि देशभरातील असंख्य शेतकऱ्यांच्या आशा,विश्वास आणि प्रगतीचा प्रवास आहे. गेल्या १८ वर्षांपासून (६५७० हून अधिक दिवस) त्यांनी स्वतःला शेतकरी सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांनी सेंद्रिय शेती,मातीचे आरोग्य,जैविक खतांचा वापर,सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व,जल व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धती यांचा सातत्याने प्रचार केला आहे.भुजबळ यांच्या या निष्ठावंत आणि दूरदृष्टीच्या कार्याची दखल फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे,तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. मॅड्रिड,स्पेन येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था 'ट्रान्स कॉन्टिनेंटल टाइम्स' (Transcontinental Times) मध्ये त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्यावर एक विशेष लेख प्रकाशित करण्यात आला होता.या आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखात त्यांच्या शेतीतील कार्याचा,सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडवून आणलेल्या बदलांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन भुजबळ यांनी १७ सप्टेंबर रोजी कृषी क्षेत्रातील आपल्या अविरत सेवेची तब्बल वर्षे (६५७० दिवस) पूर्ण केली आहेत.हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा व्यावसायिक आलेख नसून, तो हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण बनला आहे. पारंपरिक शेतीतून आधुनिक आणि सेंद्रिय शेतीकडे कसा यशस्वी बदल घडवून आणता येतो,याचे ते एक उत्तम आणि जिवंत उदाहरण आहेत. बालपणापासूनच शेतीच्या मातीशी निसर्गाच्या सानिध्यात जोडले गेलेले नितीन भुजबळ यांनी शेतीतले बारकावे आणि हंगामी पिकांचे चक्र खूप जवळून अनुभवले. रामा ॲग्रोटेक प्रा लि मधील कुशल नेतृत्व एखादा विचार तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल,तर त्याला एका भक्कम संस्थेची जोड द्यावी लागते.सध्या नितीन भुजबळ हे 'रामा ॲग्रोटेक प्रा लि'. (Rama Agrotech Pvt.Ltd.) या नामांकित कृषी कंपनीचे बिझनेस हेड (Business Head) म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.या उच्च पदावर राहूनही त्यांची नाळ मातीशी आणि शेतकऱ्यांशी तितकीच घट्ट जोडलेली आहे.रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यभर एक उत्कृष्ट नेटवर्क उभे केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन,उच्च दर्जाची आणि जैविक शेती उत्पादने (Organic Inputs) ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत .त्यांच्या या व्यावसायिक कौशल्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बनत आहे.मातीशी इमान राखून कृषी क्षेत्रात क्रांती घडवू पाहणाऱ्या नितीन भुजबळ यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .शेतकरी हिताचा त्यांचा हा रथ असाच अविरत धावत राहो,याच त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !.
संदेश कोष्टी (कवठेमहांकाळ.)
शब्दांकन
जालिंदर शिंदे (घाटनांद्रे)
