NCT NCT राजे रामराव महाविद्यालयात स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन

राजे रामराव महाविद्यालयात स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन

 

विद्यार्थिनींसाठी एस.टी. महामंडळाच्या सवलतीसाठी शिबिराचे आयोजन

नवचैतन्य टाईम्स जत दि.16(प्रा. कुमार इंगळे):- प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल या उद्देशाने राजे रामराव महाविद्यालय, जत येथे विद्यार्थिनींसाठी प्रवासी एस.टी. महामंडळाच्या सवलतीसाठी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सकाळ सत्राचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर डहाळके हे होते.                                 यावेळी डॉ.भिमाशंकर  डहाळके विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये डिजिटल व्यवहार, कॅशलेस सुविधा आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.तुकाराम उर्फ सागर सन्नके यांनी NCMC कार्डचे महत्त्व, उपयोग व फायदे विद्यार्थिनींना समजावून सांगितले. हे संपर्करहित स्मार्ट कार्ड असून टॅप करून जलद व सुलभ पद्धतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये व्यवहार करता येतो. यामुळे रोख पैशांची गरज कमी होते, तिकीट व्यवहारासाठी लागणारा वेळ वाचतो आणि डिजिटल तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्या कांबळे यांनी केले. प्रास्ताविक महिला सक्षमीकरण समितीच्या समन्वयक डॉ.मधुमती शिंदे यांनी केले. विद्यार्थिनींना सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आभार प्रदर्शन प्रा. भाग्यश्री माळी यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्याल याच्या प्राचार्य प्रा. कृष्णा रानगर, प्रा. शिवाजी कुलाळ व माजी विद्यार्थी संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थि नींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत NCMC कार्डसाठी नोंदणी केली.