NCT NCT कवठेमहांकाळ येथील 'पीव्हीपी'महाविद्यालय मध्ये आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

कवठेमहांकाळ येथील 'पीव्हीपी'महाविद्यालय मध्ये आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने हा कार्यक्रम झाला. उपजिल्यावतीन मालकार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांनी महिलांच्या आरोग्यविषयक सामान्य समस्या, प्रतिबंधात्मक उपाय, आहार, स्वच्छता आणि नियमित तपासणीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. आशा पाटील यांनीही विद्यार्थिनींना महिला आरोग्य व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे, प्राचार्य डॉ. जी. डी. कोरे, उपप्राचार्य धनपाल यादव, महिला सक्षमी करण कक्षप्रमुख डॉ. सुजाता सोलगे, प्रा. पी. यू. महामुनी, डॉ. पी. आर. माळी, डॉ. एस. एल. अंदेलवार, डॉ. आर. ए. सनदी यांच्यासह प्राध्यापक वृंद, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.