नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-मराठा आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज, बनेवाडी यांच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.कवठे महांकाळच्या तहसीलदार श्रीमती केशर खुडे यांना दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज, बनेवाडी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून शांततामय आणि लोकशाही मार्गाने आरक्षणाच्या हक्कासाठी लढा देत आहे. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण हे केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नसून, तो संपूर्ण मराठा समाजाच्या अस्मितेचा आणि हक्काचा लढा आहे.जरांगे-पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, त्याचा विचार करून शासनाने मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा समाज, बनेवाडी यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी तात्यासाहेब जगताप,संजय जगताप, श्रीरंग शिंदे, सुखदेव जगताप, तानाजी जगताप,दत्तात्रय डुबले, सुनिल जगताप, धनाजीराव तोरसे, संपत जगताप, आदर्श जगताप, रामकृष्ण जगताप, राजवर्धन तांदुळवाडे ,प्रविण पवार, पंढरीनाथ बागले, सुनील जगताप, नितेश जगताप, प्रशांत जगताप, प्रकाश तोरसे, रुपेश सुर्वे, उमाजी जाधव,चंद्रकांत जगताप आदी मराठा बांधवाच्या निवेदनावर सह्या आहेत.
जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी; बनेवाडी सकल मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन
September 11, 2026