NCT NCT आर.आर.(आबा )युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगासाठी विशेष शिबीर उत्साहात संपन्न

आर.आर.(आबा )युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगासाठी विशेष शिबीर उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-तासगाव येथे आर. आर. (आबा) युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद, सांगली यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्सचे मोजमाप घेण्यात आले तसेच आवश्यक साहित्याचे निःशुल्क वितरण करण्यात आले.दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी आधार देणे, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हीच आपल्या सामाजिक बांधिलकीची खरी दिशा आहे.या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांचे मनः पूर्वक आभार आयोजकांनी मानले .हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.