NCT NCT जागतिक लिंगायत महासभेची सर्वसाधारण सभा बेळगांवी येथे संपन्न

जागतिक लिंगायत महासभेची सर्वसाधारण सभा बेळगांवी येथे संपन्न

 नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-जागतिक लिंगायत महासभेची ८ वी सर्व साधारण सभा बेळगांवी येथे  संपन्न झाली. कर्नाटक अणि महाराष्ट्र भूमी विश्वगुरु बसवना यांच्या पवित्र पाद स्पर्शाने पावन झाली असून आजही कर्नाटक राज्यात विश्वगुरु बसवना यांचे बसवतत्व जोशात असून त्यासाठी कर्नाटक राज्यातील मठाधीपती आणि जेष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी शिवानंद जामदार साहेब यांची जागतिक लिंगायत महासभा अहोरात्र कार्य करीत असून कर्नाटक राज्यातील मठाधिपतीनी एकत्र येऊन विश्वगुरु बसवण्णा यांचे पवित्र विचार समाजा पर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून कार्य करीत असून  विश्वगुरू बसवना यांचे समाज सुधारक म्हणून जे कार्य केले ते पुढे सुरु रहावे यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. विश्वगुरू बसवना यांना कर्नाटक राज्याचे संस्कृतीक नेता म्हणून घोषना केली. विश्वगुरू बसवाण्णा यांनी दिलेला पवित्र आणि परीपूर्ण धर्म तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून कल्याण राज्य निर्माण करून समाजात धार्मिक आणि आध्यात्मिक भावणा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विश्वगुरू बसवण्णा यांनी समाजातील जातीभेद स्त्री- पुरुष यामधील विषमतेचे विरोधात बंड करून या विषमतेचे मूळ कारण वैदिक धर्मात असून या विषमतेचे मूळ कारण शोधून नष्ट करण्यासाठी त्यानी  वेद पुराण शास्त्र यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्याना इष्टलिंग अविष्कार झाला. विश्वगुरू बसवाण्णा यांना विविध उपासना मध्ये कमालीचा विरोधाभास आणि परिपूर्णता नसल्यामुळेच इष्टलिंगाचे महत्त्व वाटले.   विश्वगुरू बसवण्णा यांनी अनुभव मंटप स्थापन करून वचन साहित्य निर्माण केले ते आजच्या पिढीला बहुमोल उपयोगी आहे.  फकीरप्पा हळकटी यांच्यामुळे आज मोठय़ा प्रमाणात सर्वत्र वचन साहित्य पोहोचत आहे. कर्नाटक राज्यात जनतेला शिक्षण मिळावे म्हणून अनेक मठाधीपतीनी शिक्षण शाळा, महाविद्यालय काढली विश्वगुरू बसवण्णा यांनी कोणत्याही राजवैभवाचा भोग न घेता संपूर्ण जीवन समाज सुधारणा करण्यासाठी खर्च केले आणि आज मोठय़ा संख्येने मठाधिपती, विविध समाज संघटनेचे कार्यकर्ते विश्वगुरु बसवणा यांचे विचार जनते समोर पोहोचले पाहिजेत यासाठी झटत आहेत. कर्मधर्म संयोगाने १२ मार्च २०१८ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नागमोहन दास समितीचा अहवाल स्वीकारून लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करून घेण्यासाठी जामदार साहेब यांचे मोठे योगदान आहे.        बसव विचार, बसवतत्त्व हे कालातीत आहे. कारण हा विचार शाश्वत आहे. सहिष्णुता,सहजीवन हे बसवण्णांचे तत्त्वज्ञान आहे. मठाधीश संघटना आणि निवृत्त सनदी अधिकारी शिवानंद जामदार,  यांनी सन २०१७ सालापासून लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले असून त्यामुळे लिंगायत जागृत आणि संघटित झाला आहे.       बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर व बसवादी शरणांनी स्थापलेला लिंगायत धर्म हा स्वतंत्र महान धर्म आहे. बौध्द, जैन, शीख धर्मांप्रमाणेच लिंगायतांना सरकारी सुविधा, आरक्षण लाभ मिळवण्यासाठी धर्ममान्यतेसाठी जागृती सुरू ठेवणे. समानता, बंधुता, मानवी मूल्यांचा खरा धर्म म्हणजे लिंगायत धर्म. लिंगायतांतील लहान, मागास उपपंथांना स्वीकारून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. लिंगायतांनी आपली ओळख, अस्मिता म्हणजे इष्टलिंग धारण करणे .लिंगायतांनी आपल्या घरात जन्मापासून मृत्यूपर्यंत शरण संस्कृतीचे आचरण करणे. यासाठी मठाधीपती संघटना सातत्याने कार्य करीत आहे.      विश्वगुरू बसवाण्णा यांनी दिलेला पवित्र आणि परीपूर्ण धर्म तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून कल्याण राज्य निर्माण करून समाजात धार्मिक आणि आध्यात्मिक भावणा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विश्वगुरू बसवण्णा यांनी समाजा तील जातीभेद स्त्री-पुरुष यामधील विषमतेचे विरोधात बंड करून या विषमतेचे मूळ कारण वैदिक धर्मात असून या विषमतेचे मूळ कारण शोधून नष्ट करण्यासाठी त्यानी  वेद पुराण शास्त्र यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्याना इष्टलिंग अविष्कार झाला. विश्वगुरू बसवाण्णा यांना विविध उपासना मध्ये कमालीचा विरोधा भास आणि परिपूर्णता नसल्या मुळेच  इष्टलिंगाचे महत्त्व वाटले.                      विश्वगुरू बसवण्णा यांनी दिलेला पवित्र आणि यरीपूर्ण धर्माचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी, गुरू, लिंग, जंगम, विभूती ,रुद्राक्ष, मंत्र, प्रसाद, पादोदक अष्ठावरण यातील गुरु,लिंग,जंगम हे उपाषणा वस्तु, विभुती, रुद्राक्ष, मंत्र हे उपाषणेची साधन आहेत, प्रसाद आणि पादोदक हे फल आहे.अष्ठावरण, पंचाचार, षठ्स्थल याविषयी ज्ञान प्रसार व्हावा आणि लिंगायत धर्म जनते पर्यंत पोहोचवून कल्याण राज्य निर्माण करण्याचा उद्देश असतो विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार समाजात रूजवून कल्याण राज्य निर्माण करण्या साठी कर्नाटक राज्यातील मठसंस्था, समाजिक संघटना अहोरात्र परिश्रम घेऊन कार्य करीत आहेत. विश्वगुरू बसवण्णा यांनी अनुभव मंटप स्थापन करून विविध जातीच्या शरण शरणीनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवातून चर्चा करून कन्नड भाषेत पुढील पिडीसाठी वचन साहित्य निर्माण केले ते आजच्या पिढीला बहुमोल उपयोगी आहे.विश्वगुरू बसवण्णा यांनी लाखो जंगममुर्ती यांना तळागाळातील जनतेपर्यंत पाटवून त्याना धार्मिक शिक्षण देऊन त्याच्या समस्या दूर करून कल्याण राज्य निर्माण करण्यासाठी  कार्य केले. बुद्ध,बसवण्णा फुले शाहू आंबेडकर यांनी समाजातील विषमतेचे मुख्य कारण वैदिक व्यवस्था असून ती नष्ट करण्यासाठी त्यानी भरपूर कार्य केले आहे.विश्वगुरू बसवण्णा यानी मोठ्या प्रमाणावर जंगम मुर्तीच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा प्रसार केला. सृष्टीचा निर्माता एकच असून विविध धर्मात त्यास नावे वेगवेगळी आहेत त्याच्या उपाषणेच्या पध्दती वेगळ्या असून ज्याप्रमाणे विविध नद्यां वेगवेगळ्या स्थानी उगम पावून शेवटी एकाच समुद्राला मिळतात तसेच जगातील सर्व धर्माचे आहे मठाधीश संघटनेची धार्मिक आणि अध्यात्मिक शक्ती सनदी अधिकारी शिवानंद जामदार साहेब यांचे मार्गदर्शन यापुढे लिंगायताना मोलाचे ठरणार असून त्यांचे प्रामाणिक प्रयत्न लिंगायत समाजाला लाभ दायक ठरणार आहे.