NCT NCT उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अजय भोसेकर यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानीत

उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अजय भोसेकर यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानीत

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी ):-नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, आगळगाव यांच्या वतीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाहीर राजा पाटील सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि. १३) झालेल्या दुसऱ्या धम्म परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला.सन्मानपत्र, शिल्ड, शाल, पुष्पगुच्छ व भारतीय संविधान देऊन डॉ. भोसेकर यांचा गौरव करण्यात आला. नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुभाष माने, आर. के. गायकवाड, हंबीरराव कांबळे, गणेश मडावी, प्रा. अर्जुन करपे, डॉ. विजय धेंडे, डॉ. युवराज होवाळ, निर्मला घाडगे आदी उपस्थित होते.    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमांना महापुरुषांच्या पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.