NCT NCT राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा महायुतीला इशारा; महामंडळ वाटप न झाल्यास ४८ जागांवर बासुरी चिन्हावर उमेदवार उभे करणार-मा. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज सेना

राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा महायुतीला इशारा; महामंडळ वाटप न झाल्यास ४८ जागांवर बासुरी चिन्हावर उमेदवार उभे करणार-मा. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज सेना

नवचैतन्य टाईम्स कोल्हापूर (प्रतिनिधी ):-जोतिबा डोंगर - 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांचे महाराष्ट्रव्यापी जिल्हा दौरे सुरू आहेत. मराठवाडा विभागाचा दौरा पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावर करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय पोपट फुकटे यांच्या मागणीनुसार जोतिबा डोंगरावर कार्यकर्ता मेळावा व पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी आपली व्यथा मांडली. महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महामंडळावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वराज्य सेनेची मागणी -

भाजपचा 2014 पूर्वीपासूनचा मित्रपक्ष म्हणून आणि आतापर्यंत स्वखर्चाने महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे महामंडळावर हक्क सांगणे साहजिक असल्याचे बागल यांनी सांगितले.या अनुषंगाने पक्षाने पुन्हा मागणी केली आहे की, राष्ट्रीय स्वराज्य सेनेला -1. एक महामंडळ अध्यक्ष पद 2. चार संचालक पदे - उदा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कृष्णा खोरे विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ, लघु उद्योग समिती यावर त्वरित नियुक्ती द्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी या मागणीची त्वरित दखल घ्यावी, जेणेकरून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील.अन्यथा राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष स्वतःच्या 'बासुरी' या निवडणूक चिन्हावर महाराष्ट्रातील संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करेल आणि त्यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकद लावेल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोपट फुकटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बने, पन्हाळा तालुकाध्यक्ष आनंद लादे,  पन्हाळा उपाध्यक्ष मारुती सातार्डेकर, सातारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, महिला अध्यक्ष सौ. गुजर मॅडम व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.