NCT NCT शेगाव येथे रक्तदान महोत्सव ९० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शेगाव येथे रक्तदान महोत्सव ९० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन शेगाव तर्फे भव्य रक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान महोत्सवाची सुरुवात संत निरंकारी मिशनच्या मंगलाचरण व नामस्मरणाने करण्यात आली.रक्तदान महोत्सवाचे उद्घाटन सचिन अधाने झोनल ईंचार्जे छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती मा.प्रकाशभाऊ शेगोकार नगराध्यक्ष नगर परिषद शेगांव, प्राचार्य डॉ. शैलेश भराड सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मा.सोनू मोहोळ न. प. सदस्य यांची होती. रक्त संकलन सई बाई मोटे रुग्णालय शेगांव  व लेडी हार्डिंग अकोला ब्लड बॅंक यांचे सहकार्याने  करण्यात आले.                                                       संत निरंकारी सत्संग भवन  शेगांव येथे आयोजित या रक्तदान महोत्सवात एकूण ९० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात पुरुष आणि महिला रक्तदात्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला.सदर रक्तदान महोत्सव संतोष  शेगोकार शेगाव शाखेचे मुखी तथा बुलढाणा जिल्हा संयोजक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पाडला.झोनल ईनचार्जे सचिनजी अधाने  यांनी सांगितले की, तात्कालिक सद्गुरू बाब हरदेवजी यांचे ब्रीद वाक्य प्रमाणे रक्त नॅलियो में नही, नाडियोमे बहेना चाहीये या पवित्र शब्दाचा वारसा कायम करीत 'रक्तदान हे जीवनदान असून आपल्या एका थेंबाने गरजू रुग्णाला नव जीवन मिळते. यामध्ये निरंकारी अनुयायी यांचे सोबत शेगाव शहरा तील नागरिकांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद समाज सेवेची प्रेरणा आहे.