NCT NCT महिला आघाडीची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक 14 रोजी साताऱ्यात; घरबसल्या रोजगारावर विशेष चर्चा होणार

महिला आघाडीची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक 14 रोजी साताऱ्यात; घरबसल्या रोजगारावर विशेष चर्चा होणार

जिल्हाध्यक्ष संजय (तात्या) गाडे यांच्या आदेशान्वये आयोजन; महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई सकटे व युवती आघाडी जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. पायल गाडे यांचे मार्गदर्शन

             
नवचैतन्य टाईम्स सातारा (डॉ. अरुण राजपुरे):- महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे या उद्देशाने महिला आघाडीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक १२ वाजता सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.मा. जिल्हाध्यक्ष संजय (तात्या) गाडे साहेब यांच्या आदेशान्वये आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मा. रेखाताई सकटे तसेच युवती आघाडी जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. पायल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व सन्माननीय महिला पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीतील प्रमुख विषय असे :

१. महिलांना घरबसल्या रोजगार / काम कसे मिळवून देता येईल यावर सविस्तर चर्चा.

२. प्रत्येक महिला भगिनीकडे असलेल्या कलागुणांची आणि कौशल्यांची पडताळणी व नोंद.

३. पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी पुढील धोरणे ठरविणे.

४. आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत रणनीतीवर निर्णय.

५. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घरबसल्या रोजगार ही काळाची गरज असून, महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा या बैठकीचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला जाणार आहे.तरी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी वेळेची नोंद घेऊन कोणीही गैरहजर न राहता बैठकीस उपस्थित रहावे, ही विनंती महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई सकटे आणि युवती आघाडी जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. पायल गाडे यांनी केली आहे.