NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली;पाण्याविना शेती,पशुधन संकटात,उपाययोजना करण्याची मागणी

कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली;पाण्याविना शेती,पशुधन संकटात,उपाययोजना करण्याची मागणी

 नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर {जालिंदर शिंदे }:-चालू वर्षी कवठेमहांकाळ तालुक्यावर निसर्गाची चांगलीच अवकृपा झाली असून,चालू पावसाळा संपत आला तरीही एकही दमदार व समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.पाणी,चार्या विना पशुधन चांगलेच अडचणीत आले असून,पावसाअभावी खरीपाची पिके वाया गेली आहेत तर रब्बी हंगामाची अशाही पूर्णपणे धुसर झाली आहे.सध्या तालुक्यातील ओढे,नाले बंधारे कोरडे ठणठणीत पडले असुन विहिरीनींही सपशेल तळ गाठला आहे तर ऐन पावसाळ्यातच कुपनलिका गोळण्या टाकत आहेत.

१. शेती उद्ध्वस्त: चालू वर्षी सुरवातीच्या तुरळक पावसाच्या उपलब्ध ओलीवर तालुक्यातील बळीराजाने कशीबशी खरीपाची पेरणी केली पण नंतर पुढे मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिली व तीच पीके धुपार पडून वाय गेली आहेत.अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बीची अशाही पुर्णपणे धुसर बनली आहे.

२) पाण्याअभावी द्राक्ष बागा धोक्यात. :- नगदी पीक व पोषक वातावरण यामुळे कवठेमहंकाळ तालुक्यात द्राक्षशेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले.पण तेच क्षेत्र आज पाण्या अभावी चांगलेच मेटाकुटीला आले आहे.द्राक्षपीकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते.पण पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने हे क्षेत्र अगदीच संकटात सापडले आहे.सध्या पाण्याअभावी द्राक्ष बागा वाळू लागल्या आहेत तर काही द्राक्ष उत्पादक शेतकरी हे द्राक्ष बागा काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत.

३. ओढे,नाले,बंधारे कोरडे ठणठणीत : आज पावसाळा अखेरच्या टप्प्यावर आला तरी तालुक्यातील सर्व छोटे-मोठे ओढे,नाले,ओहळ कोरडे ठणठणीत पडले आहेत तर मोठ्या पाझर तलावातील पाणी साठाही सपाट्याने खाली होत आहे.विहीरीनी तळ गाठला असून,ऐन पावसाळ्यातच कुपनलिकाही गोळण्या टाकत आहेत.त्याचबरोबर सततच्या पाणी उपशामुळे तालुक्यातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी ३०० ते ४०० फुटांखाली गेली आहे.अनेक बोअरवेल हे निकामी झाल्या आहेत.

४. पशुधनाचा आक्रोश: चालू वर्षी अगदी सुरवाती पासूनच समाधानकारक पाऊस नसल्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार चाराच निर्माण झाला नाही.रानात नैसर्गिक चारा व पाणवठाच उपलब्ध नसल्याने जनावरांचे अतोनात हाल होत आहे.त्यामुळे पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर आपली जनावरे विकण्याची वेळ आली आहे.चाऱ्याचे भाव तर गगनाला भिडले आहेत.                              तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कवठेमहांकाळ तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात,काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा आणि शेतकऱ्यांना दुष्काळी आर्थिक मदतही तात्काळ द्यावी,अशी जोरदार मागणी केली जात आहे.प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास पशुधनाचे मोठे नुकसान असल्याची भीती सर्वत्र व्यक्त होत आहे.

 सध्या कवठेमहंकाळ तालुका हा भयानक अश्या दुष्काळाला सामोरे जात आहे.पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून,चार्यापाण्याविना पशुधन अगदी संकटात सापडले आहे.याची शासनाने तात्काळ दखल घेऊन चारा छावणी,गरज वाटेल तेथे पाण्याचे टँकर सुरू करावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी आर्थिक मदत तात्काळ द्यावी 

     

                       प्रा दादासाहेब ढेरे

          (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष.)