नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}:-“रक्तदान करा, जीवन वाचवा!” या सामाजिक संदेशाला कृतीची जोड देत सेवा संकल्प अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास नागरिक, रुग्णालयीन कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार तसेच स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कवठेमहांकाळ नगराध्यक्षा शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.आरोग्य सभापती मा गजानन कोठावळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंग तात्या पाटील, रवींद्र माने, विक्रांत पाटील, जगन्नाथ शिंदे व लोंढे सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून रक्तदात्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे रुग्णाल यातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत उत्साह निर्माण झाला.रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. यामध्ये पूनम दौंडे, वनिता माडकर, अश्विनी पाटील, अनुपमा बोंगाळे, निवेदिता कांबळे व स्मिता माळी जनाबाई गवळी यांनी सहभाग घेतला. तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये डॉ. प्रतीक मारकवाड, डॉ. शेवारे, वैभव भोसले, अभिजीत पाटील, साईराज ठोंबरे, कृष्णा वाघमारे, राज व्हनमाने, प्रतीक पाटील, श्याम गुळूमकर, रणजीत मोरे, शंकर सकट, प्रकाश खाडे, अक्षय जगनाडे, संतोष आमने नारायण सुरेश आवळे. शैलेंद्र मगदूम.यांच्यासह अनेकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.या शिबिरासाठी शासकीय रक्तपेढी, मिरज येथील रक्त संकलन अधिकारी डॉ यशवंत शेंडे व रक्तपेढीच्या पथकाने तसेच उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. रक्तसंकलनाची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.विशेष म्हणजे स्थानिक महाविद्याल यातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करून “युवाशक्ती समाज सेवेसाठी” हा संदेश दिला. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस बांधवांनीही रक्तदानात सहभाग घेत शिबिराला व्यापक सामाजिक स्वरूप दिले.रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठीची अमूल्य सेवा आहे. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कवठेमहांकाळ च्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी, रक्तपेढीचे पथक, रक्तदाते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये एकूण ४७ पिशवी रक्त संकलन झाले.


