NCT NCT जिरग्याळ (ता. जत) येथील प्रसिद्ध गवंडी बाळासो लंगोटे यांचे दुःखद निधन

जिरग्याळ (ता. जत) येथील प्रसिद्ध गवंडी बाळासो लंगोटे यांचे दुःखद निधन

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}-जिरग्याळ, ता. जत येथील प्रसिद्ध दगडी बांधकाम गवंडी बाळासो पंडित लंगोटे (वय ७५) यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.ते जत तालुक्यातील प्रसिद्ध गवंडी म्हणून परिचित होते.ते पिंटू व संजय लंगोटे यांचे वडील तर देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक विक्रम दत्तू दांडगे यांचे मेहुणे होत.त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा माती सावडण्याचा कार्यक्रम उद्या गुरुवार दि. ८ रोजी सकाळी ९ वाजता जिरग्याळ येथे होणार आहे.