NCT NCT देशिंग येथील सेवानिवृत्त एस.टी. वाहक यशवंत वावरे यांचे दुःखद निधन

देशिंग येथील सेवानिवृत्त एस.टी. वाहक यशवंत वावरे यांचे दुःखद निधन

 

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे- माळी} :- देशिंग (ता. कवठेमहांकाळ)येथील रहिवासी यशवंत मारुती वावरे (वय ६६) यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी. महामंडळ) सेवानिवृत्त वाहक होते. तसेच ते देशिंग विविध कार्यकारी विकास सोसायटीचे सदस्य होते. त्यांच्या कार्याची गावात चांगली ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शरद व शीतल यशवंत वावरे यांचे ते वडील होत.त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बाळूमामा मंदिर, घोगरे मळा (वावरे वस्ती), देशिंग येथे होणार आहे, अशी माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.त्यांच्या निधनाने देशिंग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.