नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}:-देशिंग येथील जय शिवराय गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक, माजी अध्यक्ष युवराज आप्पासाहेब कोरे (माळी) (वय ३७) यांचे आकस्मिक दु:खद निधन झाले.युवराज कोरे हे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. जय शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेपासून ते मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत होते. गावातील तरुणांना एकत्र आणून गणेशोत्सवासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अकाली जाण्याने देशिंग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. ते वस्ताद आप्पासाहेब कोरे (माळी) यांचे चिरंजीव तर रणजित कोरे यांचे मोठे बंधू होत.
माती सावरणे कार्यक्रम :-
गुरुवार, दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता बनेवाडी रोड, जखणिआई मळा, देशिंग येथे होणार आहे.कोरे कुटुंबियांच्या दु:खात देशिंगसह परिसरातील नागरिक, विविध मंडळे, सामाजिक संस्थांनी सहभागी होऊन शोक व्यक्त केला आहे.
