NCT NCT पाचगणीच्या सिग्नि पॉईंटवरून दिसतोय निसर्गाचा अद्भुत सूर्यास्त

पाचगणीच्या सिग्नि पॉईंटवरून दिसतोय निसर्गाचा अद्भुत सूर्यास्त

 

पाचगणीच्या सिग्नि पॉईंट वरून निसर्गाचा अविस्मरणीय नजारा; मावळत्या सूर्याच्या केशरी छटांनी आसमंत उजळला!

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी{नौशाद भाई सय्यद}:-महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीच्या निसर्गसौंदर्यात आणखी एक भर घालणारा मनमोहक नजारा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पाचगणी येथील प्रसिद्ध सिगनी  पॉईंटवरून दिसणारा सूर्यास्त म्हणजे निसर्गाने रंगवलेले एक सुंदर चित्रच जणू!                     क्षितिजाकडे हळूहळू मावळणारा सूर्य, आकाशात पसरलेल्या केशरी आणि गुलाबी रंगांच्या छटा, समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दूरवर चमकणारे जलाशयाचे पाणी... हे दृश्य पाहताना प्रत्येक जण काही क्षणांसाठी निसर्गाच्या प्रेमात हरवून जातो.   डोंगरांच्या कुशीतून मावळणारा सूर्य आणि वाऱ्याच्या झुळुकीसोबत डोलणारी झाडांची फांदी या संपूर्ण परिसराला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता देतात.विशेष म्हणजे, सूर्यास्ताच्या वेळी आकाशात निर्माण होणाऱ्या रंगांची उधळण छायाचित्रकारांसाठीही पर्वणी ठरत आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा निसर्गाचा सुंदर क्षण टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.       पाचगणी म्हटले की टेबल लँड, पारशी पॉईंट आणि सिग्ने पॉईंट अशी अनेक पर्यटनस्थळे डोळ्यांसमोर येतात. मात्र, सिग्निपॉईंट पॉईंट पॉईंटवरून दिसणारा हा सूर्यास्त मनाला शांतता देणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे.निसर्गाची ही रंगांची उधळण सांगून जाते... सौंदर्य पाहण्यासाठी कधी कधी शब्दांची नाही, तर फक्त शांत नजरेची गरज असते!

🌅 पाचगणीचा सूर्यास्त... निसर्गाचा अविस्मरणीय चमत्कार!