नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई धोंडीराम शिंदे (वय-८०) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी दुःखद निधन झाले.त्या माजी उपसरपंच प्रभाकर शिंदे व जिल्हा परिषदेतील अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार असुन रक्षाविसर्जन शनिवार दिनांक २४ रोजी सकाळी आठ वाजता घाटनांद्रे येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.
