NCT NCT आंबट-गोड जांभूळाची व करवंदाची चव घाटमाथ्यावर झाली दुर्मिळ,बाहेरूनचेच विक्रेते दाखल

आंबट-गोड जांभूळाची व करवंदाची चव घाटमाथ्यावर झाली दुर्मिळ,बाहेरूनचेच विक्रेते दाखल

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :- कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी  वाघोली, गर्जेवाडी, पुर्वी कुंडलापुर, जाखापुर व कुची परिसरातील डोंगर दऱ्यासह ओढ्याच्या काठावर,विहिरीच्या भोवती पुर्वी मुबलक प्रमाणात जांभळाची व करवंदाची झाडे होती.पण आजपर्यंत झालेल्या वृक्षतोडीमुळे तीच जांभळाची व करवंदाची झाडे सध्या दिसेनाशी झाली आहेत.         जांभळाच्या झाडाचे लाकूड हे कठीण,टणक, मजबूत व एक सारखे उभे असल्याने अगदी पुर्वी पासुनच घरबांधणीसाठी,बैलगाडी तयार करण्यासाठी व इंधन म्हणून वापरले जात असल्याने मोठ्या प्रमाणात जांभळाच्या झाडांची तोड झाली आहे.परंतू जांभळाची लागवड झाल्याचे प्रमाण मात्र झिरोच राहीले आहे.
घाटमाथ्यावर सध्या जुनी जांभळाची झाडेही मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे.शिल्लक राहीलेली झाडे देखील आता फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत.पुर्वीच्या झाडांच्या प्रमाणात या झाडांची लागवडही होत नाही.परंतु नवीन जातीच्या जांभळाची झाडांची फारशी वाढ काही होत नाही.तर करवंदाच्या नशिबी कायम दुर्लक्षीतपणाच आला आहे.त्यामुळे गावरान जांभळाचा व करवंदाचा पहिल्या प्रमाणे आस्वाद घेणे नागरिकांना सध्या फारच दुर्मिळ झाले आहे.                                                                      निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा,पावसासह वातावरणात होणारे बदल,अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम जांभुळ व करवंदे पिकावर झाला आहे.जांभळांची तर जुन अखेर वाट बघावी लागत आहे. कारण अनेक झाडांना मोहोर आला पण फळे आलेली नाहीत.परिणामी शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागातील आलेल्या जांभळे व करवंदे विक्रेत्यांचा कडून यांचा आस्वाद घ्यावा लागतो आहे.
फोटो:- जांभळाचे वृक्ष. करवंदाची जाळी कवठेमहांकाळ शहरात जांभळे व करवंदे विकण्यासाठी चांदोली धरण (ता शिराळा) येथील महिला कोंडाबाई ऐडगे