नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):- अगदी कवठेमहंकाळ एसटी डेपो स्थापन झाल्या पासून सुरू असणारी कवठेमहंकाळ-रायवाडी व सांगली-वाघोली या मुक्कामी असणाऱ्या एसटी बस सेवा हे कोणतेही कारण न देता अचानक बंद केल्या आहेत.त्यामुळे प्रवासीवर्गाचे अतोनात हाल होत आहे.तरी या बससेवा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा वाघोली (ता कवठेमहांकाळ) गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ साधना तुकाराम शिंदे यांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना सौ साधना शिंदे म्हणाल्या की एकतर वाघोली हे गाव अगदीच आडवळणी गाव असुन,या गावात अगदी ठराविकच एसटी बसची ये-जा सुरू असते.त्याही गाड्या आल्या नाहीत तर अक्षरशः प्रवाश्यांची खूप मोठी गैरसोय निर्माण होते.त्यामुळे त्यांना एकतर पाचसहा किलोमीटर अंतरावरील शेळकेवाडी येथे किंवा तितक्याच अंतरावरील 'वाघोली वड' या ठीकाणी जावे लागते.हे जनसामान्य प्रवाशांना,महीलांना व विद्यार्थ्यांना आवश्यक होते.हे वारोंवार संबंधित विभागांना सांगुनही त्याची दखल घेतली जात नाही. या गावातून कवठेमहांकाळला व सांगलीला कामानिमित्ताने जाणाऱ्या लोकांची व विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे तेव्हा सदर मुक्कामी येणार्या कवठेमहंकाळ-रायवाडी व सांगली-वाघोली या एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सौ साधना तुकाराम शिंदे यांनी दिला आहे.यावेळी युवा नेते प्रतापराव शिंदे,माजी उपसरपंच दत्तात्रय आठवले,जेष्ठ नेते तुकाराम शिंदे,प्रदीप शिंदेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
