NCT NCT घाटनांद्रेत कपाळी चॉंद असणारे बोकड,बघ्यांची मोठी गर्दी तर खरीदीदारही सरसावले

घाटनांद्रेत कपाळी चॉंद असणारे बोकड,बघ्यांची मोठी गर्दी तर खरीदीदारही सरसावले

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) लगत असणार्या जाधवमळा येथील प्रभाकर भगवानराव जाधव यांच्या पाळीव देशी शेळीने कपाळी चॉंद असणाऱ्या बोकडाला जन्म दिला असून,असे बोकड हे शुभ मानले जाते.तर मुस्लिम समाजात तर अश्या बोकडाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.त्यामुळे  हे बोकड पहाण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत आहे.                     जाधव यांच्या देशी शिळीने या बोकडास जन्म दिला आहे.सदर बोकडाच्या कपाळाच्या अगदी मधोमध पांढऱ्या रंगाचा चाँदचा आकार असुन,बाकीचा सर्व भाग हा काळा आहे.तर शिंगे ही अगदी सरळ आसुन तो धष्टपुष्ट व देखणा आहे.त्याला सध्या एक वर्ष पूर्ण झाले आहेत.अश्या बोकडास मुस्लिम समाजात खुपच महत्व दिले जाते.त्यामुळे त्याला 'चाँदवाल बकरा'  किंवा  'पेशानीवाला बकरा' असेही म्हणतात.          अश्याच बोकडाला पैगंबर हजरत महमंद यांनी कुरबानीसाठी पसंती दिली होती.त्यामुळे असा बकरा अल्लहाच्या राहात कुरबान केल्याने जास्त सवाब पुण्य मिळते आणि घरात बरकत रहाते असाही मानस असतो.त्यामुळे अश्या बोकडास बकरी ईदच्या कुरबानीसाठी खूप मोठे महत्व दिले जाते.सदर बोकडा बाबत अधिक माहितीसाठी प्रभाकर भगवानराव जाधव मोबाईल :- ९४२०३३९०३१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.