नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी ):-पाटबंधारे विभाग आणि विज वितरण कार्यालयाने संगनमताने शेतकऱ्याच्या भावनेशी खेळ करू नये असे प्रतिपादन कवठेमहाकांळ शिवसेना तालुका प्रमुख मारूती भाऊ पवार यांनी केले आहे, याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी तालुक्यातील कुची पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाने आदेश काढून विज वितरण कंपन्याना दिले आहेत, या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलावा क्षेत्रात पाणी साठा उपसा बंद ठेवण्याचे. आदेश कलेक्टर ऑफीसचा असताना तलावक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्याच्या खाजगी विहीर, बोअर, कुपनलिके वरील वीज बंद केल्याने शेतकऱ्याच्या जीव धायमोकलून आला आहे , नियम बाह्य कार्य हे दोन्ही कार्यालय करत असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप होत आहे , पावसाचे प्रमाण या वर्षी कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवण्याच्या संभवता नाकारता येत नाही, तलावाक्षेत्रातील ज्या शेतकर्याच्या मोटरी आहेत त्याना लेखी निवेदन देऊन, त्याना तलावाक्षेत्रातील उपसा करू नये अशी समज देऊन किंवा पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या कार्यालयीन कर्मचारीवर्गाने प्रत्यक्ष पाहणी करून तलावाक्षेत्रात जे शेतकरी मोटरी वापरतात त्याना मज्जाव करून कृती करण्याची आवश्यकता असताना तलावाक्षेत्रा बाहेरील शेतकर्याना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे निर्देशनास आले आहे पाऊस नसल्याने शेतकरी आगोदर च हवालदील झाला असून तो आपल्या खाजगी विहर,बोअर, कुपनलिकेवर आपल्या पिकांना पाणी पाजण्याचे नियोजन करत आहे तरी या शेतकर्याना पाटबंधारे विभाग व विज वितरण कंपन्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या शेतकर्याचा पिकाचे होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार सदर पिकाचा पंचनामा करून हे दोन्ही कार्यालये पिकाची नुकसान भरपाईची जबाबदारी घेतील का असा खडा सवाल कवठेमहाकांळ शिवसेना तालुकाप्रमुख मारूतीभाऊ पवार यांनी उपस्थित केला आहे़. जर शेतकऱ्याच्या भावनेशी कोणी खेळ करत असेल तर त्याबाबत कायदेशीर रित्या तहसीलदार कार्यालयासमोर कवठेमहाकांळ तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकर्याना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मारूती भाऊ पवार यांनी पाटबंधारे विभाग व विज वितरण कंपन्याना दिला आहे.
