नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ, प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त युवा सेना कवठेमहांकाळ तालुक्याच्या वतीने मोफत दुचाकी लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल जाधव व तालुकाध्यक्ष संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कॅम्पमध्ये तब्बल २३० जणांची लायसन्ससाठी नोंदणी करण्यात आली. यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल जाधव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, “नागरिक व युवकांना आरटीओचे नियम समजावून सांगणे आणि ते पाळण्याबाबत जनजागृती करणे हा या कॅम्पमागील मुख्य उद्देश आहे. तसेच अपघातानंतर लायसन्स नसल्यामुळे विमा व भरपाई मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठीच या मोफत लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.”या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. लवकरच पुन्हा अशाच प्रकारच्या कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अधिक माहितीसाठी ८८३०९१६३१० व ९६७३९७८००९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
