NCT NCT संत निरंकारी मिशनच्या वतीने नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन

संत निरंकारी मिशनच्या वतीने नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने कवठेमहांकाळ, तासगांव व सांगली  येथे नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.       शनिवारी (ता. २७) संत निरंकारी सत्संग भवन, विटा रोड तासगांव, रविवारी (ता. २८) संत निरंकारी सत्संग भवन,कोल्हापूर रोड सांगली येथे, तर सोमवारी (ता. २९) संत निरंकारी सत्संग भवन देशिंग रोड कवठेमहांकाळ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शिबिरे होतील. शिबिरामध्ये आधुनिक जपानी संगणकीय तंत्रज्ञाना द्वारे नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच सामान्य नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.आवश्यकते नुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया सांगलीतील सुदर्शन आय हॉस्पिटल येथे निःशुल्क होतील. तासगांव, सांगली, कवठेमहांकाळ व परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या स्थानिक शाखांकडून करण्यात आले आहे.