NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा

कवठेमहांकाळ तालुक्यात मोहरम सण उत्साहात साजरा

 

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-कवठेमहांकाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम हा सण धार्मिक उत्साहसह श्रद्धा व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.यानिमित्त विविध ठिकाणी ताजियांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर मोहरमच्या दिवशी सुवाद्यासह ताजियांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या सणांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी उस्फुर्त सहभाग घेतला. तालुक्यातील घाटनांद्रे, हिंगणगाव, करोली (टी) व इतर गावांमध्ये मोहरमनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना करून शांतता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मोहरमच्या मिरवणुकीमध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहरम उत्सवात सहभाग घेतला. त्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागात सामाजिक सलोखा, बंधुभाव व ऐक्याचे दर्शन घडले.

फोटो :-  घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील मशिदीत ताजियांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.फोटो- जालिंदर शिंदे