NCT NCT लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार; महागाई, आरटीआय आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरणार

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार; महागाई, आरटीआय आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारला घेरणार

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, वाढती महागाई, माहितीचा अधिकार (आरटीआय) कमकुवत होत असल्याचा आरोप आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.चव्हाण यांनी वाढती महागाई, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण, आरटीआय व्यवस्थेतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. लोकशाही संस्थांचे संरक्षण आणि जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेस राज्यभर जनजागृती व आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.                                               काँग्रेसने या आंदोलनातून सरकारला जनतेच्या प्रश्नांवर उत्तरदायी धरण्याचा निर्धार व्यक्त केला असून, विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांच्या बैठका, मोर्चे आणि निदर्शने आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.