NCT NCT देशिंगच्या उपसरपंचपदी सौ. सुमेधा जोशी यांची बिनविरोध निवड

देशिंगच्या उपसरपंचपदी सौ. सुमेधा जोशी यांची बिनविरोध निवड

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुमेधा संभाजी जोशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून देशिंग नगरीला नवे नेतृत्व लाभले आहे.   गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. जोशी यांच्यावर ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास त्यांच्या बिनविरोध निवडीमधून अधोरेखित झाला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला. देशिंग ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पवार आणि उपसरपंच सौ. सुमेधा जोशी यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
महिलांच्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी सौ. जोशी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्यकाळात देशिंग गाव स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध व्हावे तसेच महिला, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

देशिंग नगरीला नवी उपसरपंच लाभली!

🌹 सौ. सुमेधा संभाजी जोशी

उपसरपंच, ग्रामपंचायत देशिंग

बिनविरोध निवड – २०२६

"महिलाशक्तीचा सन्मान, गावाचा अभिमान!"