ॲडव्हान्स बुकिंगमुळे व्यावसायिक मालामाल
जून आणि जुलै महिन्यात मिळून केवळ १३ मुख्य व काही आपत्कालीन मुहूर्त उपलब्ध आहेत. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, बँड पथके, केटरर्स,फोटोग्राफर आणि पुरोहित यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी इच्छित तारखा न मिळाल्याने पालकांना पर्यायी किंवा आपत्कालीन मुहूर्तांचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील बऱ्याच कार्यालये व मल्टिपर्पज हॉलच्या सर्व उपलब्ध तारखांचे बुकिंग 'हाउसफुल' झाले असल्याचे समजते आहे. आगामी महिनाभर परिसरात विवाह सोहळ्यांची मोठी धूम राहणार असून, भर पावसाळ्यातही सनई-चौघड्यांचे मंगल स्वर घुमणार आहेत. शुभ विवाहासाठीचे जुन व जुलै महिन्यात एकुण १३ विवाह मुहूर्त आहेत ते पुढीलप्रमाणे ---- कंसात नक्षत्र १) रविवार दिनांक २१ (उतरफाल),
२) सोमवार दिनांक २२ (हस्त), ३) मंगळवार दिनांक २३ (हस्त),
४) बुधवार दिनांक २४ (स्वाती), ५) गुरुवार दिनांक २५ (स्वाती), ६) शुक्रवार दिनांक २६ (अनुराधा),
७) शनिवार दिनांक २७ (अनुराधा),
८) सोमवार दिनांक २९ (मूल) तर जुलै महिन्यात चातुर्मास सुरू होण्यापूर्वी दिनांक १ ते ८ जुलै पर्यंतच विवाह मुहूर्त आहेत.ते असे
१) बुधवार दिनांक १ जुलै (उतराषाढा),
२) शुक्रवार दिनांक ३ जुलै (--),
३) शनिवार दिनांक ४ जुलै (--),
४) सोमवार दिनांक ६ जुलै (उतराभाद्र),
५) मंगळवार दिनांक ७ जुलै (उतराभाद्र)
असे विवाह मुहूर्त असुन,९ जुलै नंतर देवशयनी एकादशी पासून चातुर्मास लागतो.त्यामुळे पुढे विवाह केले जात नाहीत.
