नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले):- सांगली जिल्हा परिषद निधीतून उभारण्यात येणाऱ्या दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर शिल्पा जीवनावर,बिळूरच्या सरपंच विद्याताई जाखगोंड ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामण्णा जीवनावर तसेच उपसरपंच बसू काका यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार आहे .
