नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-दि -२१ महाबळेश्वर तालुक्यात जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटूनही पाचगणी महाबळेश्वर येथे पावसाने पाठ फिरवल्याने इथे अभूतपूर्व जल संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी महाबळेश्वर यांना भूजल साठा वाचवण्यासाठी व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्याची मागणी केली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भांडवलशाही वर्ग, कंत्राटदार आणि महसूल विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे राजरोसपणे चालू आहे. यामुळे गावातील विहीर, कुपनलिका,भूजलाचा बेसुमार उपसा सुरू आहे. असा रोष स्थानिक जनतेतून होत आहे. अधिकारी अनाधिकृत बांधकामांना मूकसंमती देतात. अशा वेळेत बांधकामे थांबवली नाहीत तर संबंधित धनदांडगे टँकरने पाणी विकत घेऊन बांधकामे पूर्ण करतील नाईलाजाने भूजल साठा कमी होऊन इथल्या नागरिकांवर पिण्याचे पाण्याचे फार मोठे संकट ओढवू शकते. प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच यांनी गाव पातळीवर एकमताने ठराव संमत करून गावातील सर्व जलस्रोत विहीर, तलाव, झरे यांचा वापर फक्त पिण्यासाठीच करावा.अनाधिकृत बांधकामासाठी पाणी वापरता येणार नाही. अशा आशयाच्या कायदेशीर नोटीस गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देऊन कायदेशीर नोटीसा बजवाव्यात तसेच महाबळेश्वर तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी अनाधिकृत बांधकामे, उत्खलन करणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती येणाऱ्या वेळेत कायदेशीर कारवाईची मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करणार आहोत. अशाप्रसंगी आपण एक विचाराने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि भूजल लूट आपण थांबवू शकतो अशी ही प्रतिक्रिया ननावरे यांनी व्यक्त केली.
