NCT NCT "जतमध्ये 31 जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर विविध शासकीय सेवा एकाच छताखाली"

"जतमध्ये 31 जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर विविध शासकीय सेवा एकाच छताखाली"

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी) :- जत तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दि. 31 जुलै 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’बालाजी मंगल कार्यालय जत येथे आयोजित करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.    मा. जिल्हाधिकारी, सांगली श्री. मैनाक घोष (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी, जत श्री. अजयकुमार नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडणार आहे. मा. आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होणार असून, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.                                                    शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी बालाजी मंगल कार्यालय, जत येथे होणाऱ्या या शिबिरात महसूल, आरोग्य, पंचायत समिती, महावितरण, कृषी, पाटबंधारे, वन, नगरपरिषद, एसटी आगार, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख, निबंधक, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, बँका, एलआयसी, क्रीडा विभाग आदी विविध विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.                                                                     यामध्ये सातबारा उतारा, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेसह विविध महसूल विषयक सेवा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.                                             अधिक माहितीसाठी संपर्क 7588019276, 9028129925, 9423020961, 8080162012.