NCT NCT बोरगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

बोरगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

 

विविध शासकीय योजनांचा लाभ एकूण ७,६३८ लाभार्थींना लाभ

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील मातोश्री हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान पार पडले. या अभियानांतर्गत एकूण ७,६३८ लाभाथ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभदेण्यात आला.                   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच स्व. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्यनिमित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर पार पहने. या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभातील योजनांची माहिती देण्यात आली, विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज व तक्रारीचा तत्परतेने निपटारा करण्यात आला,
शिबिरात मान्यवरांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने कार्यकरत शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून याव्यात, असे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी समाधान शेडगे, तहसीलदार अर्चना कापसे, तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी उल्हास भांगे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे सह तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.