नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ, रांजणी, अग्रण धुळगाव, कोकळे, लोणारवाडी,आधी परिसरात स्वर्गीय अजित दादा ची जयंती विविध उपक्रमात साजरा करण्यात आला.रांजणी ( ता. कवठेमंहाकाळ) येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच,उपसरपंच व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजित दादांची जयंती साजरी करण्यात आली.कुलकर्णी विद्यालयामध्ये मान्यवरांच्या हस्ते अजित दादाची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा नंबर एक,यशवंत विद्यामंदिर, रेणुका विद्यामंदिर, प्राथमिक शाळा रांजणी, जिल्हा परिषद शाळा कोकळे नंबर एक, दोन, केंद्रातील 18 शाळा व माध्यमिक शाळांमध्ये विविध संस्थेमध्ये अजितदादांना अभिवादन करण्यात आले.
