नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीबद्दलचे प्रेम कराडमध्येही पाहायला मिळत आहे. शहरातील दत्त चौक परिसरात फुटबॉलप्रेमींनी मेस्सीचा भव्य कटआउट उभारला असून तो नागरिकांसह युवकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सोशल मीडियावरही या कटआउटचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या जगभरात फुटबॉलचे वातावरण रंगत असताना कराडमधील चाहत्यांनीही आपल्या आवडत्या खेळाडूला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. अनेक नागरिक या कटआउटसमोर फोटो आणि सेल्फी काढताना दिसत असून परिसरात फुटबॉलची विशेष चर्चा रंगली आहे. अशा प्रकारचे भव्य कटआउट शहरात क्वचितच पाहायला मिळत असल्याने दत्त चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक फुटबॉलप्रेमींच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, कराडमध्ये फुटबॉल संस्कृती अधिक बळकट होत असल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे. आगामी काळात फुटबॉल स्पर्धा, युवा स्पर्धकांना प्रोत्साहन आणि क्रीडा उपक्रम वाढावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे
कराडमध्ये फुटबॉलप्रेमाची अनोखी झलक; दत्त चौकात मेस्सीचा भव्य कटआउट आकर्षणाचा केंद्रबिंदू
July 05, 2026