NCT NCT मायथळ येथे "मायथळ बुक बँक"चा उत्साहात शुभारंभ मा. मधुकर नरळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कमल मंगल फाउंडेशनचा विशेष उपक्रम

मायथळ येथे "मायथळ बुक बँक"चा उत्साहात शुभारंभ मा. मधुकर नरळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कमल मंगल फाउंडेशनचा विशेष उपक्रम

नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले):- कमल मंगल सोशल फाउंडेशन, जत  आणि शालेय व्यवस्थापन समिती, मायथळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. मधुकर नरळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त "मायथळ बुक बँक" या विशेष उपक्रमाचा उद्घाटन समारंभ जि.प. प्राथमिक शाळा, मायथळ येथे दि. 4 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मधुकर नरळे साहेब, संचालक नोबल सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस प्रा. लि. व मा. शिवशंकर माळी साहेब केंद्रप्रमुख सनमडी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून जत तहसील चे नायब तहसीलदार माननीय कुंभार मॅडम व शिक्षक नेते अण्णाराव पाटील सर उपस्थित होते.            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मधुकर नरळे साहेब, संचालक नोबल सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस प्रा. लि. हे होते."पुस्तक वाचूया, ज्ञान वाढवूया"* या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या बुक बँकेच्या माध्यमातून मायथळच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. "एक पुस्तक अनेकांचे भविष्य उजळवेल" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कमल मंगल सोशल फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे.यावेळी मा. मधुकर नरळे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले,                                      "आज माझ्या वाढदिवसाला सर्वात मोठा आनंद म्हणजे मायथळच्या मुलांच्या हात पुस्तक देण्याचे भाग्य मला लाभले. शिक्षण हेच खरे दान आहे. या बुक बँकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली पुस्तके मिळतील आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळेल. कमल मंगल फाउंडेशन नेहमीच समाजहिताच्या कार्यासाठी तत्पर आहे आणि राहील."या प्रसंगी मा. अमोल बाबर, अध्यक्ष कमल मंगल सोशल फाउंडेशन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मा. श्रावण कोरे सर, जि. प. प्रा. शाळा मायथळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री विधाते सर, जि. प. प्रा. शाळा मायथळ यांनी मानले.                                                                     या कार्यक्रमास मायथळ गावचे सरपंच आबासाहेब भंडे, SMC चे माजी अध्यक्ष मारुती भंडे, अमोल कोळी, श्रीकांत पाटील, उत्तम भंडे, आप्पा कलगुंडे, शिवशरण, मायाप्पा भुसनूर, सुनील पाटील, श्रीकांत भुसनूर, बाळासाहेब सोलंकर सर, शिवाजी कांबळे तसेच सर्व पालक वर्ग व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. संजय भंडे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मायथळ आणि मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा मायथळ तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.