NCT NCT बावधन येथील रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

बावधन येथील रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी (मकसुद शेख):-बावधन अष्टगंध कॉलनी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मठ बावधन या ठिकाणी गुरुपौर्णिमा विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम पार पडला गुरुवर्य रेणुका गुरुरंजीता नायका पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिरात जवळजवळ साठ ते सत्तर ब्लड बँग रक्त स्वामी भक्तांनी डोनेट करण्यात आले तसेच दोन हाजार लोकांचा महाप्रसादाचा स्वामी भक्तांनी आनंद घेतला बावधन वाई तालुक्यातील अनेक दिग्गज लोकांनी मठाला भेट देऊन आनंद व्यक्त केला गुरुवर्य रेणुका गुरूरंजीता नायका पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे सर्व सदस्य यांनी कार्यक्रम अनेक सामाजिक उपक्रम करून पार पाडला स्वामी मठामुळे बावधन व बावधन परिसरात अनेक लोकांच्या भेटीगाठी मठात होत आहेत बावधन अष्टगंध कॉलनी या ठिकाणी स्वामी दर्शनासाठी दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आरती भजन कीर्तन व सामाजिक उपयोगी कार्यक्रम या मठात केले जातात गुरुवर्य सर्वांना सांगतात श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी यामुळे मठात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे येणाऱ्या काळात अनेक समाज उपयोगी उपक्रम बावधन स्वामी समर्थ मठ या ठिकाणी करण्यात येणार आहेत.