नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):- प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्ताने श्री चिदंबर महास्वामी मंदिर कवठेमहांकाळ येथे विविध भागातून दिंड्यापालख्यांचे आगमन झाले होते. यामुळे मंदिर परिसराला मोठ्या प्रमाणात वैशनवांचा मेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.सोहाळ्यास मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे संयोजन हे चिदंबरदास गुरू गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले. प्रारंभी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिवचिदंबर मंदिर परिसरात विविध भागांतून आलेल्या पायी दिंड्या पालख्यांचे आगमन झाले. यामध्येमोराळे(ता.तासगांव),मळणगांव(ता.कवठेमहांकाळ) नरसिंहवाडी (ता.शिरोळ), सांगोला, आजनाळे, दरीबडची (ता.जत),सावळज, मणेराजूरी(ता तासगांव) येथील दिंड्यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता. सदर दिंड्यापालख्यांची एकत्रित रित्या शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.सदर पालखी मिरवणूक महांकाली हायस्कूलच्या मैदानावर येताच तिथे जबरदस्त असा रिंगण सोहळा पार पडला.यावेळी भाविक भक्तांनी एकच जल्लोष केला.सदर मिरवणूक पुन्हा मंदिर परिसरात येताच तिथे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
गुरु पौर्णिमेनिमित्त श्री चिदंबर स्वामी मंदीरात विविध भागांतून आला पालखी सोहळा,रिंगण सोहळ्याने सांगता..
July 31, 2026