NCT NCT एका शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे केंद्रातील सरकार कोसळणार आहे का..?- मा.भगवानदास केंगार जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद

एका शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे केंद्रातील सरकार कोसळणार आहे का..?- मा.भगवानदास केंगार जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद

       नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले ):-गेल्या महिनाभरापासून शांततेत सुरू असलेल विद्यार्थ्यांच्या आंदोलन आता हिंसक वळणावर पोहोचलेली आहे. देशातील विद्यार्थी व तरुण बेरोजगार  यांच्या भविष्यासाठी एक सामाज सेवक सोनम वांगचुक यांनी आपलं आयुष्य पणाला लावून  गेल्या 26/27 दिवसापासून हा व्यक्ती दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर उपोषण सुरू केलेला आहे पण केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्यांना यांच्याकडे बघण्यासाठी चर्चा करण्यासाठी ही वेळ नाही ही शोकांतिका आहे..निट पेपर फुटी मुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले 25-30 विद्यार्थी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण..?                 यानंतर महाराष्ट्रातही अनेक वेळा पेपर फुटी झाली लातूर पॅटर्न च्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांना लुटले व मोठमोठे अधिकारी व्यापारी यांच्या धन दांडग्यांची मुलं 100 पैकी 100 मार्क घेऊन मोकळे झाले. यामुळे सर्वसामान्यांची मुलं या शिक्षणापासून वंचित राहिले याला राज्यातील व देशातील शिक्षण खात जबाबदार नाही का..? याला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे.. व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार नाहीत का..?                                                                 ज्या शिक्षण खात्याचे मंत्रीपद त्यांच्याकडे आहे त्यांची ही जबाबदारी नाही का ? त्यांना विद्यार्थ्यांनी जाब विचारायचा नाही का ? त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं नाही का ?                                                       या राज्यातील व देशातील संपूर्ण शिक्षण खात्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने का बघितले नाही.. त्याचवेळी शिक्षण मंत्र्यांनी चर्चेची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्या बरोबर चर्चा केली असती तर हे आंदोलन इतकं चिघळले नसते. यात अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी जखमी झाले एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले याला केंद्रीय शिक्षण मंत्री याच्यां बरोबर मोदी सरकार ही तितकच जबाबदार आहे कारण हे प्रकरण त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवणं गरजेचं होतं. पण यात सरकारने वेळ काढू पणा केला.. अजूनही वेळ गेलेली नाही  पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून या प्रकरणाला जबाबदार असणारे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण इथेच थांबवणे अत्यंत गरजेची आहे. सरकारला केंद्रीय  शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घ्यायचा नाही.? त्यांना सरकार का पाठीशी घालतोय.? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे देशातलं सरकार कोसळणार आहे का..? मोदी सरकार त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही.. हा प्रश्न देशातील विद्यार्थी व तरुण बेरोजगार जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.. केंद्र सरकारने यात मध्यस्थी करून लवकरात लवकर हा वाद संपवावा अन्यथा याचे परिणाम संपूर्ण देशात बघायला मिळतील ही परिस्थिती आहे..असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे..