नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-कराडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिशक्ती महिला कार्यकर्त्या, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळपासूनच हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाच्या वतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेत आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता आणि वडापावची व्यवस्था केली. सकाळपासून अनेक विद्यार्थी थेट महाविद्यालयातून आंदोलनस्थळी दाखल होत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना आवश्यक सहकार्य केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी असून समाजातील विविध घटकांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कराडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सामाजिक कार्यकर्त्यांकडून चहा-नाश्ता व वडापावची व्यवस्था
July 25, 2026