NCT NCT बोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न,७६३८ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

बोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न,७६३८ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

 नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव (ता कवठेमहांकाळ) येथील मातोश्री मल्टिपर्पज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान पार पडले. अभियानांतर्गत एकूण ७,६३८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्यनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज व तक्रारींचा तत्परतेने निपटारा करण्यात आला.                                                   शिबिरात मान्यवरांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने कार्य करत शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले.उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे,तहसीलदार अर्चना कापसे,तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी उल्हास भांगे,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे,पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळेसह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

महसूल समाधान शिबीरातील योजनानिहाय लाभार्थी

१) राज्य शासनाच्या योजना :- ५४०१.

२) केंद्र शासनाच्या योजना :- १५८६.

३) जिवंत सातबारा मोहिम :- ५४३.

४) इतर लाभ :- ५३.

५) महिला शेतकरी 

६) सन्मानपत्र :- २५.

७) घरकुल योजना :- १२.

८) गावठाण स्वामित्व :- ९. 

९) मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना :- ९. इत्यादी.)