नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे ):- सूर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल भिवघाट (ता खानापूर) च्या वतीने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून,याशिबीरात शंभर रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून, औषधोपचार घेतला. प्रारंभी सरपंच अमर शिंदे यांनी प्रतिमा पूजनासह दिप प्रज्वलन करून विधीवतपणे सदर शिबीराचे उदघाटन केले.यावेळी उपसरपंच सागर शिंदे, तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे, दिलीप शिंदे,सुर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे आकाश माळीसह रुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ अश्विनी इराकर यांनी रुग्णांची तपासणी केली तर सौ महीला लोखंडे,सौ वर्षा माळी,सौ स्नेहल चंदनशिवे, नितेश कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले.
