NCT NCT गुरु पौर्णिमेनिमित्त कवठेमहांकाळला विविध भागांतून पायी दिंड्या

गुरु पौर्णिमेनिमित्त कवठेमहांकाळला विविध भागांतून पायी दिंड्या

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):- प्रतिवर्षी प्रमाणे चिदंबर महास्वामी यांच्या कृपेने व सद्गुरूंच्या आशिर्वादाने याही वर्षी गुरुपौर्णिमे निमित्ताने श्री क्षेत्र शिवचिदंबर देवस्थान कवठेमहांकाळ येथे विविध भागांतून पायी दिंड्या येणार आहेत. यानिमीतांने मंदिर परिसरात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याचा तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिदंबरदास गुरू गोविंद महाराज यांनी केले आहे.  सदर दिंड्यांमध्ये मोराळे (ता तासगांव), मळणगांव (ता कवठेमहांकाळ),नरसिंहवाडी,सांगोला, आजनाळे, दरीबडची (ता जत),सावळज,मणेराजूरी(ता तासगांव) येथील दिंड्यांचा समावेश आहे.
फोटो :- १) कवठेमहांकाळ येथील श्री शिवचिदंबर महास्वामी मुर्ती.२)श्री चिदंबरस्वामी महाराज मुर्ती.३) प्रथम दाखल झालेल्या दिंडी पालखीचे सार्थ्या करताना चिदंबरदास गुरू गोविंद महाराज