NCT NCT गोलमाल टीमची पाचगणीत एन्ट्री; अजय देवगण व रोहित शेट्टींची चाहत्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

गोलमाल टीमची पाचगणीत एन्ट्री; अजय देवगण व रोहित शेट्टींची चाहत्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद ):- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या पांचगणी भेटीची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला.         अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची जोडी गोलमाल आणि सिंघम सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या पाचगणी भेटीमागे चित्रपटाचे चित्रीकरण, लोकेशन पाहणी किंवा वैयक्तिक दौरा यापैकी नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.                                                   दरम्यान, त्यांच्या आगमनामुळे पाचगणीतील पर्यटक आणि स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.