NCT NCT शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ"जत पूर्व भागात माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले व शारीरिक शिक्षण संचालक श्रीमंत ठोंबरे यांचा संपर्क दौरा; शिक्षक, शेतकरी व उद्योजकांशी सुसंवाद"

शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ"जत पूर्व भागात माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले व शारीरिक शिक्षण संचालक श्रीमंत ठोंबरे यांचा संपर्क दौरा; शिक्षक, शेतकरी व उद्योजकांशी सुसंवाद"

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी):- सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले आणि माजी शारीरिक शिक्षण संचालक श्रीमंत ठोंबरे यांनी जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख, ठोंबरे वस्ती, तिकुंडी आणि भिवरगी या गावांचा संपर्क दौरा केला.                        या दौऱ्यात त्यांनी पेन्शनधारक शिक्षक, शेतकरी, राजे रामराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला.  संख येथील आर. के. पाटील महाविद्यालयाचे संस्थापक आर. के. पाटील यांची भेट घेऊन महाविद्यालयातील विविध शाखा, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच शिक्षक आमदार प्रतिनिधी संदर्भात चर्चा करण्यात आली.                तिकुंडी येथील राजे रामराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व उद्योजक प्रकाश माटोळी यांनी उभारलेल्या बेदाणा प्रकल्पाला भेट देण्यात आली. या प्रकल्पामुळे पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना द्राक्षांच्या बेदाण्यास योग्य व परवडणारा दर मिळत असून, अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हा या भागातील एक आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यानंतर प्रकाश माडोळी यांनी तिकोंडी येथे सुरू केलेल्या आदर्श विद्यालयाला सदिच्छा भेट देण्यात आली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. तिकोंडी गावातील हे मराठी माध्यमाचे एकमेव विद्यालय असून, शिक्षक आमदार प्रतिनिधी संदर्भात हितगुज करण्यात आले.                                          दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात भिवरगी येथील शेतकरी धुळा भिवा वाघमोडे यांच्या द्राक्षबागेला भेट देण्यात आली. तसेच येथील हायस्कूलमधील शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या.