NCT NCT अखेर संविधान जिंकले-सौ साधना धेंडे-कांबळे

अखेर संविधान जिंकले-सौ साधना धेंडे-कांबळे

 नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):-अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी दिल्लीमध्ये 'जय भीम' चा जयघोष करत संपूर्ण दिल्ली आणि भारत देश हादरवण्याचं काम केले आहे. सध्याच्या काळात प्रथमच एका झेंड्याच्या खाली संपूर्ण भारत देश समतेच्या मुद्द्यावर एकत्र आलेला दिसत आहे. विशेषता नवी पिढी याचे नेतृत्व करत आहे.ही पिढी संविधानाला स्मरून काम करणारी आहे हे या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे.नवी पिढीच्या अंगामध्ये हे संविधान भिनलेले आहे हे दाखवून देत,समतेच्या वाटेवर हे तुफानातले दिवे नक्कीच बेरोजगारी, शिक्षण आणि राजकीय नवा चेहरा दाखवतील व प्रगल्भ विचारांच्या मुली सुद्धा खर्या अर्थाने साऊजिजाऊच्या लेकी घडताना दिसतील असे वाटत आहे.त्याचबरोबर नजीकच्याच काळात क्रांती नक्कीच होणार असे दिसत आहे.एकटा युवक सुद्धा वणवा पेटवू शकतो हे या आंंदोलने दाखवले आहे. अशी जळजळीत प्रतिक्रिया महीला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा सौ साधना कांबळे- धेंडे यांनी जंतरमंतर वरील यशस्वी आंदोलना बाबतीत व्यक्त केली आहे.