नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करून एक प्रकारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू माती,नैसर्गिक रंग आणि कागदाच्या लगद्यापासून आकर्षक अश्या गणेश मूर्ती साकारल्या.यावेळी उपक्रमशील शिक्षिका सौ साधना धेंडे-कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व पटवून दिले.तर गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी आहे, असे मत मुख्याध्यापक बी एस शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींचे प्रदर्शन शाळेच्या आवारात भरवण्यात आले असून,पालकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
"मातीची मूर्ती ही पाण्यात लवकर विरघळते आणि नदी-तलाव, विहिरी प्रदूषित होत नाही.सर्वांनी अश्या मातीच्याच मूर्ती बसवाव्यात,"असे विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यां, ग्रामस्थ व पालकांना सांगितले
यावेळी मुख्याध्यापक बी एस शिंदे, उपक्रमशील शिक्षिका सौ साधना धेंडे-कांबळे, प्रकाश वाघमोडे, लक्ष्मण लवटे,भारत काळे, दिलीप खाडे,जयसिंग बोबडे, जयानंद स्वामी,श्रीमती शोभा पाटील,सचिन पाटील, संतोष शिवाजी शिंदे, संतोष पांडुरंग शिंदे, गौतम कांबळेसह शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.
फोटो :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी तयार केल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती




