नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, कवठेमहंकाळ शहरासह तालुक्यातील बाजारपेठेत मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.कवठेमहांकाळ शहरातील गणेश मूर्ती स्टॉलवर आणि सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी असून लहान-मोठ्या आकाराच्या मूर्तींचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे. सोबतच मखर, लायटिंगच्या माळा, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापड, फेटे आणि आरास सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली असून विक्रेत्यांनीही मुबलक साहित्य उपलब्ध केले आहे. दुष्काळ सदृश्य स्थगीती व वाढत्या महागाईनंतरही ग्राहकांचा उत्साह मात्र कायम असल्याचे चित्र आहे.दर वर्षी प्रमाणे यंदाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.शाडू मातीच्या मूर्तीला जास्त पसंती दिली जात आहे,असे मूर्तिकारांनी सांगितले. दराच्या बाबतीत किंचित वाढ असली तरी परिस्थीती 'जैसे थे' च आहे एकंदरीत निराकार निर्गुण असणार देव मात्र गणरायाच्या आगमनाने विविध रुपात आला आहे. गणरायाच्या आगमनाने बाजार पेठेत मात्र चैतन्य आले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात गणपती बुकिंग व सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची धांदल
September 12, 2026


