NCT NCT विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत घाटनांद्रे येथील सर्वोदय विद्यालय प्रथम

विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत घाटनांद्रे येथील सर्वोदय विद्यालय प्रथम

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर {जालिंदर शिंदे }:-
श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे (ता कवठे महांकाळ) येथे झालेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वोदय विद्यालय घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला व त्यांची पुढे जिल्हास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या त्यांच्या यशाबद्दल माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेत सहभागी झालेले 

सहभागी विद्यार्थी हे पुढील प्रमाणे,

१) कु हर्षद संतोष शिंदे - इयत्ता ८ वी. 

२) कु आदित्य बाळकृष्ण गुरव - ९ वी.

३) कु ऋतुजा संतोष शिंदे - इयत्ता - १० वी.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी एस शिंदे,स्पर्धा परीक्षा प्रमुख भरत काळे, सौ साधना धेंडे-कांबळे, जयसिंग बोबडे जयानंद स्वामी, लक्ष्मण लवटे, दिलीप खाडे, प्रकाश वाघमोडे ,शोभाताई पाटील, सचिन पाटील व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाचे परीसरातून कौतुक केले जात आहे.