NCT NCT आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलला पर्यटकांसह स्थानिकांचीही पसंती; तुफान गर्दीने पाचगणी फुलली!

आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलला पर्यटकांसह स्थानिकांचीही पसंती; तुफान गर्दीने पाचगणी फुलली!

 नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी {नौशाद भाई सय्यद}:- निसर्गसौंदर्य, थंड हवेचे आल्हाददायक वातावरण आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात सध्या ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ची विशेष चर्चा रंगताना दिसत आहे. या फेस्टिव्हलला पर्यटकां सह स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.या फेस्टि व्हलच्या निमित्ताने पाचगणीच्या पर्यटनाला एक वेगळीच रंगत आली आहे. आकर्षक सजावट, मनोरंजनाची साधने, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, सांस्कृतिक वातावरण आणि आनंदाचे क्षण अनुभवण्या साठी नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.विशेष म्हणजे, हा फेस्टिव्हल केवळ पर्यटकांचे आकर्षण न राहता स्थानिक नागरिकां साठीही आनंदाचा उत्सव ठरत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी आणि मित्रपरिवारा सोबत मनोरंजन करण्यासाठी नागरिकांची पसंती या फेस्टिव्हलकडे वाढताना दिसत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पाचगणीच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होते. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकां नाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पाचगणीची ओळख केवळ टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि निसर्गरम्य डोंगररांगां पुरती मर्यादित न राहता अशा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे अधिक व्यापक होत आहे .एकंदरीत, ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ ने पर्यटक आणि स्थानिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून, तुफान गर्दीमुळे पाचगणीच्या पर्यटन नगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.पाचगणीची ओळख, पर्यटनाचा उत्साह आणि स्थानिकांच्या आनंदाचा सोहळा!