नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर{जालिंदर शिंदे }:- रेणुका विद्यामंदिर,कोकळे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन–२०२६ स्पर्धेत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित घाटे गुरुजी शिक्षण संकुल,शिरढोण येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये संकुलातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदर्शित केला.तसेच शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत संकुलातील सहायक शिक्षक दशरथ चव्हाण यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशस्वी सहभागासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घाटे यांची प्रेरणा लाभली.संस्थेचे खजिनदार सचिन घाटे, संचालिका सौ सुषमा घाटे, मुख्याध्यापक काकासाहेब वाघमोडे यांचेही मोलाचे मार्ग दर्शन लाभले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदाचेही मोलाचे व महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले .विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जन शीलता आणि प्रयोगशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने संकुलातील शिक्षक व विद्यार्थी विविध शैक्षणिक उपक्रमां मध्ये सातत्याने सहभागी होत असतात. या प्रदर्शना तील सहभाग आणि मिळालेले यश यामुळे संकुलाच्या शैक्षणिक वाटचालीला निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.या यशा बद्दल सहभागी विद्यार्थी,यशस्वी शिक्षक दशरथ चव्हाण आणि सर्व सहकारी शिक्षकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घाटे गुरुजी शिक्षण संकुलाचे यश,शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत दशरथ चव्हाण तृतीय
November 27, 2026